| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
मा. शुभम गुप्ता ,आयुक्त यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेकडे विविध कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी निविदा समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक निविदामध्ये प्राप्त होणारे दर महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने ठेकेदार, मक्तेदार यांच्याशी समक्ष वाटाघाटी करून निविदा प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.
साधारणपणे सांगली, मिरज आणि कुपवाड
महापालिकेकडे विविध विभागाकडील ४३ कामासाठी २ कोटी ४लाख ५१ हजार ८३५ रकमेच्या प्राप्त निविदा झाला होत्या. समक्ष ठेकेदार आणि मक्तेदार यांच्याशी निविदा दराबाबत वाटाघाटी करून २० लाख ६७ हजार ३१३/- इतक्या मोठ्या रकमेची बचत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील २३, तर जलनि:सारणकडील ५ कामे, पाणीपुरवठाकडील ५ कामे, प्रभाग समिती ३ कडील ६ कामे, प्रभाग समितीकडील १ काम
कार्य शाळा ३, अशी कामे आहेत ,
महापालिका क्षेत्रातील विकास कामे होणे आवश्यक आहे. त्याच बरोबर खर्चात बचत देखील होणे महापालिकेच्या आर्थिक हिताचे आहे. ही बाब श्री. शुभम गुप्ता आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली गठित समिती यांनी जाणीवपूर्वक व प्रयत्न करून भरीव बचत करण्याकडे कल वाढला आहे. परिणामी २० लाखापेक्षा जास्त रक्कम बचत होऊन महापालिकेच्या आर्थिक लाभ झाला आहे. या पुढे देखील महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विचारपूर्वक आणि प्रयत्न करण्यात येणार आहे असे या वेळी मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगितले आहे.