| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑगस्ट २०२४
'जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा' अशी घोषणा काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या मोर्चासाठी मी काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नव्हे तर तुमचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे. तुम्ही ज्या वेळेला शपथ घेत होतात, तेव्हा तुमच्या प्रमाणेच मीही ती शपथ घेतली आहे. त्यामुळे मी तुमच्या बंधनात अडकलेलो आहे, आता कुणी काळजी करण्याचे काम नाही. जुनी पेन्शन देईल त्यालाच मत देण्याचा निर्धार आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या जुनी पेन्शन आक्रोश मोर्चामध्ये पृथ्वीराजबाबा पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत तुम्ही सारे एकदिलाने, निर्धाराने आमच्या सोबत होतात, परंतु कदाचित आम्हीच कुठेतरी कमी पडलो, आणि केंद्रात ती संधी हुकली. राज्यात हे फसवं सरकार राज्यामध्ये आहे, सांगली, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी भव्य मोर्चे काढण्यात आले. त्यावेळी शासनाने एक समिती निर्माण केली, त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधींनी जाहीर आश्वासन दिली. परंतु मुख्य मुद्दा बाजूला ठेवला, आणि संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. असा आरोप पृथ्वीराज बाबा पाटील यांनी वेळही केला.
कुणाच्या सुपीक डोक्यातून आयडियाला माहीत नाही परंतु 2005 पूर्वी ज्यांची जाहिरात दिली आहे, आणि त्यातून ज्यांची नियुक्ती केली आहे त्यांनाच पेन्शन दिली जाईल. तुम्ही अशा पद्धतीने फूट पाडून जर प्रयत्न करत असाल तर ते शक्य होणार नाही. असा घनाघात करून पृथ्वीराजबाबा म्हणाले की, इथं निवृत्त झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. त्यामुळे कुणी असं समजण्याचं कारण नाही की त्यांना पेन्शन मिळाली म्हणून ते बाजूला झाले आहेत. कोणतेही सरकार सत्तेवर असताना जुनी पेन्शन दिली म्हणजे ती भीक नव्हे, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, पेन्शन म्हणजे तुमच्या संपत्तीचा भाग आहे. त्यामुळे आपण काही वेगळं मागत नाही. आपण आपल्या संपत्तीतील हक्काचा भाग मागतो आहोत. मी जाहीरपणे सांगतो की ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया ज्या वेळेला सुरू होईल, त्यावेळेला तुमचा मुद्दा त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी मी आग्रहट्टाने नेत्यापुढे बाजू मांडेन, की मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शपथ घेतली आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यात यासंबंधीचा मुद्दा समाविष्ट करावा असा आग्रह धरेन, असेही पृथ्वीराज बाबा पाटील यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनावेळी 45 शासकीय कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिलेले शेकडो कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विभागीय अध्यक्ष सागर खाडे, शिक्षक संघाचे विनायक शिंदे, माणिकराव पाटील, आरोग्य संघटनेचे राज्य अध्यक्ष अरुण खरमाटे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील ठाकरे शिवसेनेचे संजय विभुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित संघटनांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी ' जो पक्ष जुनी पेन्शन योजना मंजूर करण्याबाबतचा विषय विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्यात घेईल, त्याच पक्षाच्या उमेदवाराला व पक्षाला मी व माझे कुटुंबीय, माझ्या सर्व मित्र परिवार मतदान करतील. जो राजकीय पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात असेल त्याला मतदान करणार नाही.' अशी शपथ घेतली.