Sangli Samachar

The Janshakti News

सांगली भाजपावतीने बदलापूर अत्याचाराच्या घटनेबाबत जाणीव जागर आंदोलन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑगस्ट २०२४
भाजपा सांगली जिल्हा शहर व ग्रामीणच्या वतीने समाजात आजच्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या पुन्हा घडू नयेत व महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली जाणीव जागर आंदोलन करण्यात आले. 

आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हे जाणीव जागर आंदोलन करण्यात आले. बदलापूर मध्ये जो प्रकार घडला तो वाईटच होता. म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतोच समाजात अशा घटना वारंवार घडू नयेत, आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून, भाजप पक्षाच्या वतीने आम्ही हा जाणीव जागर करत आहोत. हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता आणि होऊच शकत नाही. सर्व महिलांना न्याय मिळाला पाहिजे हीच भाजपची प्रमुख भूमिका आहे. म्हणूनच लाडकी बहीण, महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत, लखपती दीदी, लेक लाडकी अशा अनेक योजना भाजपा व महायुती सरकारने आतापर्यंत आणल्या आहेत. महिलांचे सशक्तीकरण व सबलीकरण हेच भाजपचे धोरण आहे. दोषीवर कडक कारवाई झालीच पाहिजे ही आमची ही मागणी आहे. असे यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले.


यावेळी भाजपा मध्य प्रदेश तथा छत्तीसगड राज्य संघटन महामंत्री अजय जमवाल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश पूर्व महामंत्री रघुनाथ कुलकर्णी, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, प्रदेश निमंत्रित सदस्य नीताताई केळकर, सांगली लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख योगेश बाचल, माजी आमदार नितीन शिंदे, किसान मोर्चा प्रदेश सचिव पै. पृथ्वीराज पवार सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष प्रभारी उपस्थित होते.