Sangli Samachar

The Janshakti News

स्वर्गीय घनशामशेठ बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रवणयंत्राचे वाटप ! लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या माध्यमातून व स्वर्गीय घनशामशेठ बजाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बारा श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक मा. संकेत बजाज, युनूस महात, असिफ बावा यांच्या हस्ते या श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. 

गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या सहयोगाने गरजू रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत असते, सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ संजयजी बजाज साहेबांमुळे मिळत आहे याच अनुषंगाने हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कामाचा पाठपुरावा सांगली शहर जिल्ह्याचे आरोग्यदूत उमर गवंडी, रोहित आठवले, डॉ शुभम जाधव, निलेश शाह यांनी केला.


यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सागर घोडके, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक हरिदास पाटील, पक्षाचे आरोग्यदूत उमर गवंडी, सेवादल व ग्राहक संरक्षण समितीचे सांगलीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे सांगली शहर अध्यक्ष अकबर शेख, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे फिरोज मुल्ला, सरचिटणीस सुभाष तोडकर, अभिजित रांजणे, मुन्ना शेख, सरफराज शेख, सामाजिक न्याय विभागाचे मिरज शहर अध्यक्ष भीमराव बेंगलोरे, सामाजिक न्याय विभागाच्या कुपवाड अध्यक्षा अनिता शिवशरण, सांगली क्रिकेट असोसिएशनचे युसूफ जमादार आदी उपस्थित होते.