Sangli Samachar

The Janshakti News

राजकारणातील लेडी सिंघम तुतारी आणि घड्याळ सोडून घेणार हातात 'हात' !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ७ ऑगस्ट २०२४
आपल्या फर्डा वक्तृत्वाने आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाने राजकारणातील 'लेडीज सिंघम' अशी ओळख प्राप्त केलेल्या पक्षाच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सोनिया दुहान यांनी प्रथम शरद पवार यांची तुतारी आणि नंतर अजित पवार यांचे घड्याळ हाती घेतले होते. परंतु दोन्ही ठिकाणी आपल्या कर्तृत्वाला वाव मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्याने, आणि त्यातूनच पक्ष नेतृत्वाशी मतभेद झाल्याने दुहान यांनी आता 'काँग्रेसचा हात' हातात घेण्याचे ठरवले आहे.

मूळच्या हरियाणाच्या असलेल्या सोनिया दुहान या राष्ट्रवादीतील मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली. परंतु तुतारी न वाजता त्यांचे सुप्रिया सुळे यांच्याशीच वाजले. परिणामी गेले दोन महिने त्या राजकीय अभिनय विजनवासात होत्या. त्यांनी अजित पवार यांच्याशी संधान बांधून हातात घड्याळ बांधण्याची तयारी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु तेथेही दुहान यांचे डाळ शिजली नाही.


महाराष्ट्र बरोबरच हरियाणा ते विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत. हीच विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोनिया दुहान या हरियाणात प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात बस्थान बसवण्यासाठी पक्ष प्रवेशाचा घाट घातला असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस नेते आणि पक्षाचे हरियाणा प्रभारी दीपक बावरिया, प्रदेशाध्यक्ष उदयभान, माजी मुख्यमंत्री भूपिंद्र हुड्डा, खा. दिपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार असल्याचे दुहान यांनी सोशल मीडियावरील पोस्ट मधून जाहीर केले आहे.