Sangli Samachar

The Janshakti News

वाचाळवीर अनुराग ठाकूर हे मनुवादी सरकारचा खरा चेहरा, जोडे मारो आंदोलनाव्दारे निषेध !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑगस्ट २०२४
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. त्यावर राहूल यांची जात कोणती, असे विचारणारे वाचाळवीर अनुराग ठाकूर हे भाजपच्या मनुवादी प्रवृत्तीचा खरा चेहरा आहेत, असा हल्लाबोल करत काँग्रेसने आज ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले.

आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीसमोर आंदोलन करण्यात आले. जात विचारुन भाजपानं केवळ राहूल गांधी यांचाच नव्हे तर तर देशातील अनुसुचित जाती, जमाती, आदिवासी, ओबीसी या सगळ्या घटकांचा अपमान केला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला. ‘जातीयवादी, मनुवादी भाजपाचा धिक्कार असो, अनुराग ठाकूर राजीनामा द्या, चले जाव.. चले जाव- मोदी सरकार चले जाव, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, राहूल गांधी जिंदाबाद, भाजपाचे कारभारी - समता व संविधानाचे मारेकरी’, अशा घोषणा देण्यात आल्या.


यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘संसदेत मंत्री ठाकूर हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात विचारतात हे निंदनीय आहे. असंसदीय व अशोभणिय वर्तन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकूरना माफी मागायला सांगितले पाहिजे होते, मात्र त्यांनी ठाकूर यांच्या मनुवादी जातीय वक्तव्याला पाठिंबा दिला. देश हे सगळे बघतो आहे. हे लोकशाहीचे, संविधानाचे अवमूल्यन आहे.’’

मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, बिपीन कदम, सी.आर. सांगलीकर, डॉ. नामदेव कस्तुरे, प्रा. एन.डी.बिरनाळे, आण्णासाहेब कोरे, अजिजभाई मेस्त्री, अजय देशमुख, संजय काळोखे, संपत पाटील, लखन, सीमा कुलकर्णी, प्रतिक्षा काळे, क्रांती कदम, विक्रमसिंह पाटील, शेरु सौदागर, संभाजी पाटील, भाऊसाहेब पवार वकील, महावीर पाटील धामणी, शेवंता वाघमारे, शमशाद नायकवडी, कांचन खंदारे, इलाही बारुदवाले, संजय काळोखे, अजित ढोले, अशोकसिंग रजपूत, अनिल मोहिते, राजू पाटील, दिक्षित व भारती भगत, अल्ताफ पेंढारी, आयुब निशाणदार, प्रशांत अहिवळे, यश सुनके, विजय आवळे, आशिष चौधरी, प्रशांत देशमुख, राजेंद्र कांबळे, मनोज पवार, संभाजी पाटील, मौलाली वंटमुरे, पैगंबर शेख, सुनिल मोहिते, माणिक कोलप, डी. पी. बनसोडे, आनंदा लिगाडे, अरुण पळसुले, विठ्ठल काळे, सागर मुळे, सुनिल पिराळे, अरुण गवंडी, अभिजित परीट, गणेश वाघमारे, रामभाऊ पाटील, सुरेश गायकवाड व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते