Sangli Samachar

The Janshakti News

राजकोट किल्ल्यावरील 35 फूट उंचीच्या छत्रपतींच्या पुतळ्याबाबत कला संचालन्याच्या खुलाशाने नवा वाद होण्याची शक्यता ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० ऑगस्ट २०२४
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत, दररोज नवनवे दावे आणि आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत. आता राज्याच्या कलासंचालनालयाच्या संचालकांनी केलेल्या माहितीमुळे नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी काल राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळलीच्या दुर्घटनेबाबत जनतेची माफी मागितली असून, विरोधकांनी यात राजकारण न आणता, छत्रपतींचा नवा पुतळा बसवण्याच्या निर्णयासोबत राहण्याचे अपेक्षा व्यक्त केलेले असतानाच, एक नवी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक राजू मिश्रा यांनी, महाराजांच्या 35 फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली नव्हती, तर अवघा सहा फूट पुतळा उभारण्यास परवानगी दिली होती, असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.


याबाबत बोलताना राजीव मिश्रा म्हणाले की क्ले मॉडेलला नौदलाला मान्यता देण्यात आली. मात्र हा पुतळा 35 फूट उंच असल्याचे आणि पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टील वापरण्याबाबत, आम्हाला कल्पना देण्यात आली नव्हती. तसेच आमच्याकडे फक्त सहा फूट उंचीची परवानगी मागण्यात आली होती. परंतु झालेल्या दुर्घटनेबाबत जाब विचारण्याचा अधिकार असे हे राजीव मिश्रा यांनी म्हटले आहे. 

जेव्हा या कलाकाराकडे काम देण्यात आले तेव्हा ज्या एजन्सीने त्यांना उंची आणि मटेरियल ठरवण्याचा अधिकार दिला, त्या समितीमध्ये कलाकारांने 35 फूट उंचीबाबत ची माहिती देणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे मदतही त्यांनी मागितली नव्हती. आता या साऱ्या दुर्घटनेत नेमके दोषी कोण ? याबाबत नव्याने चर्चा आणि वाद सुरू होणार आहे.