yuva MAharashtra मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत देशातील १० तर राज्यातील तीन जैन तीर्थस्थळांचा समावेश !

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत देशातील १० तर राज्यातील तीन जैन तीर्थस्थळांचा समावेश !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जुलै २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साठ वर्षावरील नागरिकांसाठी तीर्थ दर्शन योजना जाहीर केली होती. परंतु यामध्ये एकही जैन तीर्थस्थानाचा समावेश नव्हता. याबद्दल जैन समाजातील शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांनी जैन समाजाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेत करावी अशी मागणी केली होती. त्याची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी देशभरातील 10 व राज्यातील तीन तीर्थक्षेत्रांचा समावेश या योजनेत केला आहे. त्यामुळे जैन समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जैन धर्मीयांना यात्रेसाठी लाभ मिळणार असून जैन बांधवामध्ये यामुळे आनभावनी भावना निर्माण झाली आहे. जैन धर्मियांसाठी पूजनीय व श्रद्धेय अशा श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्रसह देशातील दहा तर राज्यातील बाहुबली, मांगीतुंगी आणि एलोरा लेणी या तीन जैन तीर्थ क्षेत्रांचा यामध्ये समावेश केला आहे. याबद्दल विविध सामाजिक जैन संघटना व संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.


या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व धर्मीयांसाठी साठ वर्षे वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी मिळवून दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 14 जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला असून, भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 अशा विविध धर्मीयांच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. आयुष्यात एकदा तरी पुण्य कर्म म्हणून तीर्थक्षेत्रे जाण्याची प्रत्येकाची सुट्टी असते ही पूर्ण व्हावी म्हणून राजे शासनाने आपल्या योजनेत जैन धर्मियांच्या तीर्थस्थळांचा समावेश केल्याने प्रथमच अशा यात्रेच्या माध्यमातून शासनाकडून धर्मयात्रेचा लाभ होणार आहे.

या योजनेनुसार पात्र व्यक्तीला योजनेचा एक वेळ लाभ घेण्याची संधी असून प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, निवास व भो व्यवस्था अशा बाबींचा समावेश आहे. 

या योजनेमुळे आर्थिक दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचा लाभ मिळणार असल्याने सर्व सदर नियम प्रमाणे जैन धर्मियांमध्ये हे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.