| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जुलै २०२४
नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशीनिमित्त अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला होता. पंढरपूरसह संपूर्ण राज्यात सर्व ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात भक्तीभावाने पूजा करण्यात आली. सांगलीतील गावभाग, स्टेशन रोड आणि इतर ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत, विठू माऊलीच्या गजरात पूजा करण्यात आली होती.
सांगली येथील जामवाडी चौकात ७५ वर्षाहून अधिक पुरातन असलेल्या नामदेव मंदिरातही आषाढी एकादशी निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी प्रकाश खटावकर व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने श्री विठ्ठलाला अभिषेक करण्यात आला. यावेळी भाजपचे युवा नेते व किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पै. पृथ्वीराज भैय्या पाटील हे खास करून उपस्थित होते. त्यांनी श्री विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली.
यावेळी मंदिराचे विश्वस्त श्री.गजानन मुळे ( पुजारी), श्री.धनंजय होमकर, श्री.रविंद्र वादवणे, श्री.मधुकर बारटक्के, बाळासाहेब मुळे, श्री.उदय मुळे, श्री.किरण बोंगाळे त्याचबरोबर निमंत्रीत व सल्लागार ही उपस्थित होते. अनेक समाज बांधवांनी तसेच भक्तगणांनी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
जामवाडी येथील हे नामदेव मंदिर 75 वर्षाहून अधिक पुरातन आहे. सध्या उपलब्ध निधीनुसार याचे जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. यासाठी भाविकांनी अधिकाधिक देणगी द्यावी, असे आवाहन या निमित्ताने मंदिर ट्रस्टींनी केले आहे.