yuva MAharashtra लाडक्या बहिणीना यादीत नाव आहे का तपासायचे आहे ? मग ही बातमी तुमच्यासाठी !

लाडक्या बहिणीना यादीत नाव आहे का तपासायचे आहे ? मग ही बातमी तुमच्यासाठी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई दि. १२ जुलै २०२४
महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना' कार्यान्वित केली आहे. 1 जुलैपासून या योजनेत सहभागासाठी महिलांचे तुडुंब गर्दी, यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता संबंधित शासकीय कार्यालयात दिसून आली. यावेळी त्यांना अनेक समस्यांना तोंडही द्यावे लागले. पण अडथळ्यांची शर्यत पार करीत लाडक्या बहिणींनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केलाही. 15 ऑगस्ट पासून सर्व पूर्तता केलेल्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता उत्सुकता आहे ते आपले नाव या यादीत आहे का याबद्दल. 

पण ई सेवा केंद्र असो किंवा शासनाचे कार्यालय. येथे माहिती मिळवण्यासाठी काय अनुभव आहे ते नव्याने सांगणे नको. तेव्हा यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवण्या ऐवजी काही पर्याय आहे का ? असा सवाल महिला वर्गातून विचारला जात होता. त्यामुळे शासनाने घरबसल्या ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी खालील स्टेप पूर्ण करून आपले नाव यादीत आहे का याची माहिती घेता येऊ शकते.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन Apply Link

सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटच्या होम पेजवरील "Apply Online" या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर पुढील नवीन पेजवर, ऑनलाइन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.

शेवटी, फॉर्ममध्ये विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर सब्मिट बटणवर क्लिक करून फॉर्म सब्मिट करा. आता तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळेल, ज्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यावा लागेल आणि तो जपून ठेवावा लागेल. यानंतर तुम्ही याच क्रमांकाच्या आधारे तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती काय आहे हे तपासू शकता.

टीप - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाइट आणि अर्ज ऑनलाइन लिंक लवकरच सरकारद्वारे सक्रिय केली जाईल. यानंतर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तूर्तास महिला या नारीशक्ती अॅपद्वारे देखील त्यांचा अर्ज भरू शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना यादीत आपले नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम, माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि मुख्यपृष्ठावरील "लाभार्थी यादी" (Beneficiary List) या लिंकवर क्लिक करा. पुढे, तुमचा जिल्हा, तहसील, गाव आणि प्रभाग निवडा आणि खाली दिलेल्या चेक लिस्ट (Check List) बटणावर क्लिक करा. 

यानंतर, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता तुम्ही तुमचे नाव माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत पाहू शकता.