| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जुलै २०२४
पंढरपूरचा विठोबा हा संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक आंध्र आणि इतर राज्यातील भाविकांसाठी जिव्हाळ्याचा विषय. कार्तिकी आणि आषाढी एकादशीला येथे भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. पायी दिंडीतून, रेल्वे व एसटी या सार्वजनिक वाहनातून तर काही भाविक हे स्वतःच्या वाहनातून पंढरपूरला येत असतात.
अशा भाविकांसाठी आता महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला असून, पंढरपूर कडे येणाऱ्या सर्व मार्गावरील वारककऱ्यांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना शासनाने नुकतीच काढली आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांच्या दिंडींना निधी देण्याची लोकप्रिय घोषणा केली होती. . त्याचप्रमाणे पंढरपूर मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही अडचण व सुविधा होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना स्थानिक प्रशासनाला दिली आहे.