| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
जयंत पाटील यांनी नऊ वेळा अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षांचा कानोसा घेत माध्यमांमध्ये त्यावर चर्चा घडत असते. त्या संदर्भातल्या बातम्या छापल्या जात असतात. नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब वृत्तपत्रामधून उमटत असते. हे जयंत पाटील यांना माजी अर्थमंत्री म्हणून चांगलेच ठाऊक असल्याचा टोला देत आपला अर्थसंकल्प फुटला नसल्याचे प्रत्युत्तर अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी विधानसभेत दिले.
गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच फुटला असल्याचा दावा केला होता. विधिमंडळ अधिवेशनात हे याचे प्रतिबिंब उमटले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प कुठला असल्याचा आरोप केला होता.
याचा समाचार घेत अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या आपला भाषणात अर्थसंकल्प कुठल्या च्या आरोपांना जोरदार प्रचंड दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की भाषणाच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करतो, अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. ते केवळ राजकीय दृष्टिकोनातून केलेले आहेत. यावेळी अजित पवार यांनी आपल्या काकांच्या आरोपांचे ही शरसंधान केले. त्यांच्या भाषणानंतर सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांना समर्थन दिले. विरोधी पक्षात विरोधात घोषणांनी हे सभागृह दणाणून सोडले.