| सांगली समाचार वृत्त |
पलूस - दि. ३० जुलै २०२४
पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठी सांगलीत पोहोचलेल्या भारतीय सैन्य दलाचे जवान, एन.डी.आर.एफ.ची टीम पलूस तालुक्यातील औदुंबर येथे रविवारी पूर परिस्थितीचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पोहोचली होती. प्रात्यक्षिक झाल्यानंतर सर्व जवानांसाठी एका मल्टीपर्पज हॉलमध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी स्वयंपाक घरात काही महिला स्वयंपाक करत असल्याचे पाहून मंडळ अधिकारी सुरेखा जाधव तेथे पोहोचल्या आणि त्यांनी पोळपाट लाटणे हातात घेऊन चपाती लाटावयास बसल्या.
देश व जवानांमध्ये आदर व्यक्त करण्यासाठी पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून सुरेखा जाधव यांनी जे कार्य केले त्याबद्दल उपस्थित सैन्य दल व आणि एनडीआरएफचे जवान भारावून गेले. योगायोगाने सुरेखा जाधव व एन डी आर एफ चे जवान सुशील अस्वले यांचा वाढदिवस. या दोघांचा वाढदिवस उपस्थित आणि टाळ्यांच्या गजरात साजरा केला.
दरम्यान मंडळ अधिकारी सुरेखा जाधव यांनी केलेली एक साधी पण मनाचा मोठेपणा दाखवणारी कृती इतर अधिकाऱ्यांसाठी व समाजासाठी निश्चितच एक आदर्श ठरावी. पदापेक्षा आणि स्वतःच्या मोठेपणापेक्षा मनाचा मोठेपणा श्रेष्ठ असतो हेच जाधव यांनी दाखवून दिले आहे.