yuva MAharashtra सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा आणखी एक स्तुत्य उपक्रम !

सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा आणखी एक स्तुत्य उपक्रम !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जुलै २०२४
सांगली महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून शुभम गुप्ता यांनी नवनवीन संकल्पना राबविण्यात सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वच कामगारांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकारी असो व सर्वसामान्य कर्मचारी, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करणे. आता त्या पुढील एक पाऊल गुप्ता यानी टाकले आहे. कुटुंब प्रमुख या नात्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छापत्र पाठविण्यास सुरुवात केली आहे.



एप्रिल 2024 पासून ज्यांचे वाढदिवस असतील त्यांना आपल्या सहीचे शुभेच्छापत्र देण्याचा अभिनव उपक्रम, कर्मचाऱ्यांचा आणि सांगलीकरांचा चर्चेचा विषय बनला आहे. या कृतीने कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीचे वातावरण तयार झाले असून, त्यांच्यात उत्साह आनंद निर्माण झाला आहे. अधिकारी कर्मचारी हा भेदाभेद न ठेवता सर्वांनाच समान भूमिकेतून शुभेच्छापत्र देत शुभम गुप्ता यांनी केलेले कार्य महापालिकेला प्रगतीपथावर नेण्यासाठीचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे.