yuva MAharashtra 'तुमचे पार्सल आलंय !' हा मेसेज तुम्हालाही आला तर सावधान; मोठा गफला होऊ शकतो !

'तुमचे पार्सल आलंय !' हा मेसेज तुम्हालाही आला तर सावधान; मोठा गफला होऊ शकतो !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जुलै २०२४
'तुमचं पार्सल आलंय !' असा एसएमएस तुमच्या मोबाईलवर आला तर सावध व्हा... कारण ऑनलाइन फॉर्म करणाऱ्या मंडळींनी हा नवीन फंडा शोधून काढला आहे. सध्या अनेक गोष्टी आपण ऑनलाईन मागवत असतो. स्मार्टफोनमुळे बँकिंग व्यवहाराची माहिती ही आपल्याला याच एसएमएसद्वारे मिळत असते. आणि हाच धागा पकडून ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींनी, अनेकांना गंडा घातला आहे.

'इंडियन पोस्ट ऑफिस'च्या नावाने एक मेसेज सध्या मोबाईलधारकांना देत आहे. याला रिप्लाय दिलेल्या काही लोकांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेण्यात आल्याचे प्रकार घडल्याने, पोलिसांनी आता नागरिकांना याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे तुम्हालाही असा मेसेज आला तर 'सावधान' 

मेसेजला रिप्लाय देण्यापूर्वी, हा मेसेज कुठून आला आहे याची खातरजमा करून घ्या. तुम्ही काही पार्सल मागवले आहात का ? तुम्हाला कोणी पार्सल पाठवल्याची खात्रीलायक माहिती असल्याशिवाय या मेसेजेस ना रिप्लाय देऊ नका. अन्यथा तुमची मोठी फसगत होऊ शकते.