| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ७ जुलै २०२४
भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यातच त्यांच्यावर रुग्णालयात एक किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु बुधवारी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किरकोळ उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला असला तरी, त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरने दिला आहे.
काल विविध माध्यमातून लालकृष्ण आडवाणी यांच्या निधनाची बातमी व्हायरल झाली आणि एकच हालकल्लोळ माजला. अनेकांनी याची माहिती न घेता श्रद्धांजलीही वाहिली. परंतु आडवाणी जे यांची तब्येत ठीक असल्याचे पाहून त्यांच्या समर्थकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. परंतु कुठल्याही नेत्याची अशी अस्वस्थ करणारी बातमी सोशल मीडिया वरून वायरल झाली तर त्याची पूर्ण खात्री करून घेणे हेच उत्तम.