Sangli Samachar

The Janshakti News

मतदान नोंदणी कॅम्पला आ. सुधीरदादांनी दिली भेट !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जुलै २०२४
लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच, आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक निकाल होणार आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही नव मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपानेही दंड थोपटले आहेत. याचाच एक भाग म्हणजे मतदान नोंदणी कॅम्प.


त्यानुसार कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार आज रविवार दि. ३० जून पासून सुरू झालेल्या मतदान नोंदणी कॅम्पला आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या, आणि लांब नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या मतदाराला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

आ. सुधीर दादा गाडगीळ यांचे आवाहन...


यावेळी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. गितांजली ढोपे-पाटील, मा. नगरसेवक लक्ष्मणभाऊ नवलाई, किरण निडसोसे, विजय चोक्कोडीकर, अरुणाताई बाबर, महादेव ढोपे-पाटील, सुनील शिकलगार, अभय पाटील, गिता रेड्डी, राणीताई, मयुरी सूर्यवंशी, मनीष सुतार, आदी नागरिक उपस्थित होते. हा कॅम्प पुढे ३ दिवस चालणार आहे, तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सांगली शहर भाजपा तर्फे करण्यात आले आहे.