yuva MAharashtra NEET पेपरची किंमत 32 लाख रुपये! मास्टरमाइंडने सांगितले कसा अन् कधी फोडला पेपर !

NEET पेपरची किंमत 32 लाख रुपये! मास्टरमाइंडने सांगितले कसा अन् कधी फोडला पेपर !

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जून २०२४
नुकत्याच झालेल्या NEET पेपर लीक प्रकरणामागील कथित सूत्रधार, अमित आनंद याने या सर्व प्रकरणात धक्कादायक कबुली दिल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आरोपीने दिलेल्या जबाबानुसार, अमित आनंदने प्रत्यक्ष परीक्षेच्या एक दिवस अगोदर NEET ची प्रश्नपत्रिका फो़डल्याची कबुली दिली आहे. 


यासाठी त्याला 32 लाख रुपये मिळाले असल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे. आरोपी अमित आनंदने पोलिसांना सांगितले की, तो परिक्षेच्या आदल्या रात्री उमेदवरांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पुरवायचा व त्यांना ते रात्रभर पाठ करायला लावायचा.

दरम्यान नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर देशभरातील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ मोठी आंदोलने करत संतप व्यक्त केला होता. याचबरोबर त्यांनी ही परीक्षा रद्द करत फेर परीक्षा घेण्याची मागणी केली होती. यानंतर एनटीएने काल रात्री एक पत्रक काढत 2024 ची नीट परीक्षा रद्द केली आहे.