Sangli Samachar

The Janshakti News

शिवरायांचा सर्वधर्म समभावाचा विचार मजबूत करण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा - पृथ्वीराज पाटील



सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ जून २०२४
छ. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील सर्व धर्मीय बारा बलुतेदार अठरा पगड जातींच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य निर्माण केले. शिवरायांच्या आदर्शाची प्रेरणा सांगलीकरांना कायम मिळत रहावी म्हणून सांगलीत विरेंद्र पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून छ. शिवबांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ दोन वर्षापूर्वी रायगडावरून आणलेली संपूर्ण देशातील पहिली शिवज्योत प्रज्वलित केली. त्याची द्विवर्षपूर्ती साजरी करताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांचा देव्हारा म्हणजे ३० फूटी मेघडंबरीची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.ती पहाण्यासाठी सांगलीकर हजारोंच्या संख्येने आल्यामुळे आम्ही सद्गदित झालो. छ. शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार मजबूत करणे व त्यांच्या महापराक्रमाला वंदन करून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा करण्यात येत आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.


यावेळी पृथ्वीराज पाटील व डॉ. संजय यांनी छ. शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून सर्व शिवप्रेमी सांगलीकरांच्या वतीने अभिवादन करुन त्यांनी अखंड शिवज्योत पूजन केले. यावेळी महिलांनी जिजाऊ वंदना सादर केली.'फत्तेशिकस्त पावनखिंड' या गाजलेल्या चित्रपटाचे गायक अवधूत गांधी आळंदीकर यांनी पोवाडा, अभंग, व शिवरायांच्या जीवनचरित्राशी सबंधित गाणी सादर केली. हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. मेघडंबरी साकार केलेले अमन विधाते मुंबई, अवधूत गांधी व कलाकार यांचा पृथ्वीराज यांनी तर शिवज्योत संकल्पक विरेंद्र पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार अवधूत गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी विद्युत रोषणाई,लेझर शो, फटाक्यांची आतषबाजी, शिवगर्जना, छ. शिवाजी महाराज की जय, एकच धून सहा जून, जय भवानी - जय शिवाजी घोषणांनी सांगलीचा आसमंत शिवमय झाला.

पृथ्वीराज पाटील फौंडेशनने आयोजित केलेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्यास डॉ.संजय पाटील,माजी नगरसेवक मंगेश चव्हाण व दिलीप पाटील, करीमभाई मिस्त्री, रविंद्र वळवडे, अल्ताफ पेंढारी, महाबळेश्वर चौगुले, ताजुद्दीन शेख, बाळासाहेब काकडे, अजीज मिस्त्री,भारती भगत, लालू मेस्त्री, किर्ती देशमुख, पुष्पलता पाटील,अर्चना पवार, सुवर्णा पाटील, प्रितम रेवणकर, अजय देशमुख, शशिकांत पाटील,बिपीन कदम, सनी धोतरे,हुल्याळकर मामा व पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि सांगलीकर शिवप्रेमी यांनी नीटनेटके आयोजन केलेल्या या सोहळ्यात शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.