yuva MAharashtra "आरारा... 50 पैशात ढीगभर बातम्या फेम" संपतराव खराडे यांचे निधन !

"आरारा... 50 पैशात ढीगभर बातम्या फेम" संपतराव खराडे यांचे निधन !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जून २०२४
सांगली म्हटलं की ज्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत त्यामध्ये 'दैनिक ललकार' आणि या दैनिकाला प्रसिद्धीच्या झोकात आणणारे संपतराव खराडे. सायकलवरून गल्लीबोळात फिरून " आरारारा... 50 पैशात ढीगभर बातम्या वाचा !" अशी आरोळी ठोकत सायंदैनिक ललकारला सुप्रसिद्ध करण्यात संपतरावांचा सिंहाचा वाटा होता. 1990 अखेर दररोज सायंकाळी घुमत राहणारी ही आरोळी आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. कारण नुकतेच संपतराव खराडे यांचे दुःखद निधन झाले.

शहरातील ज्या ठिकाणची बातमी असेल तिथेच संपतरावांची "ललकारी" अधिक घुमायची. या आरोळीमुळे संपतरावांवर अनेकदा मारहाणीचे प्रकारही गुदरले होते. परंतु न डगमगता, कोणाचीही फिकीर न करता संपतरावांची आरोळी साधारणपणे 1990 पर्यंत घुमत होती. मात्र यानंतर ललकारचे सायंदैनिकामधून दैनिकात रूपांतर झाल्यानंतर संपतरावांची ही आरोळी ऐकू येणे बंद झाले. अर्थात सांगलीकरांच्या कानात ही आरोळी मात्र कायम तशीच घुमत राहणार आहे.