Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेस निकालाआधी एक्झिट पोलच्या चर्चेत भाग घेणार नाही !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १ जून २०२४
लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर टीव्ही चॅनेल, सोशल व डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस आपले प्रवक्ते पाठवणार नसल्याचे जाहीर केले आहे. 

काँग्रेसच्या मीडिया अँड पब्लिसिटी विभागाचे अध्यक्ष पवन खेडा यांनी हा मुद्दा एक्सप्रेसवर मांडला. त्यांनी म्हटले की, आगामी एक्झिट पोलच्या चर्चेत भाग न घेण्याच्या पक्षाच्या निर्णय घेतला आहे. तसेच, मतदारांनी मतदान केले असून मतदानाचे निकाल मशीनमध्ये लॉक केले आहेत. येत्या ०४ जून रोजी निकाल सर्वांना दिसेल, असेही ते म्हणाले.


दरम्यान, निकाल जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने हार मानली असून आपल्या प्रवक्त्यांना मीडियाशी बोलण्यास मज्जाव केला आहे. काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले की, काँग्रेस पक्ष 4 जूनपासून पुन्हा चर्चेत आनंदाने सहभागी होईल. निकाल जाहीर होण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक अंदाजात गुंतून टीआरपी खेळण्याचे कोणतेही समर्थन नसल्याचे म्हटले आहे.