Sangli Samachar

The Janshakti News

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून हॅट्रिक; ८ जूनला शपथविधी होणार !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ६ जून २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढील पंतप्रधान येईपर्यंत काळजीवाहू सरकार राष्ट्रपतींची विनंती त्यांनी मान्य केली आहे. दरम्यान एनडीएच्या नेते पदे नरेंद्र मोदी यांचे एकमताने निवड करण्यात आली असून चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांनी मोदींना पाठिंबा देणार असल्याचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे येत्या सात तारखेला इंडियाच्या सर्व खासदारांचे संसद भवन परिसरात बैठक होणार असून त्यानंतर राष्ट्रपतींकडे सरकार बनवण्याचा दावा केला जाणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुरमुरे यांनी सतरावी लोकसभा भंग केल्यानंतर आता देशात पुन्हा सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला या निकालात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पुन्हा बहुमत मिळाला आहे त्यात भाजपने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या असून एनडीए कडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे दिल्लीत काल झालेल्या इंडिया बैठकीत नरेंद्र मोदी यांचे एकमताने नेते पदे निवड करण्यात आली.

भारताच्या 147 कोटी जनतेने गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील जनकल्याणकारी योजनेतून देशातील प्रत्येक भागात विकास होताना पाहिला आहे दीर्घ काळापासून जवळपास सहा दशकांनंतर भारतातील जनतेने सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सशक्त नेतृत्व निवडले आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित लढले आणि जिंकले याचा आम्हाला गर्व आहे आम्ही सर्व इंडियाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची सर्व संमतीने निवड करीत आहोत असे एनडीएच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार भारतातील गरीब, महिला, युवा, शेतकरी, शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे भारताच्या वारसाच रक्षण करण्यासाठी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एनडीए सरकार भारताच्या जनतेतील आयुष्यात सुधारणा आणण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

इंडिया आघाडीने पंतप्रधानपदावर दावा सांगितल्याने भारताचा भावी पंतप्रधान कोण होणार याबाबत केवळ देशातच नव्हे तर जगभरात उत्सुकता लागून राहिले होती. विशेषतः चीन पाकिस्तान तरी शत्रू राष्ट्र प्रमुखांचे लक्ष लागून राहिले होते. भारताच्या पंतप्रधानपदी आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सारखा खमक्या नेता अरुण झाल्यामुळे भारताच्या कुरघोड्या करण्याचे सर्वांचे स्वप्न भंगले असल्याची चर्चा सर्वत्र दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या दहा वर्षात जी रचनात्मक प्रगती केली आहे, त्याचा पुढील अंक यशस्वीरित्या मोदीच पूर्ण करू शकतात हा विश्वास भारतीय मतदारात असल्यामुळे एनडीएला पूर्ण बहुमतापर्यंत नेण्याची जबाबदारी भारतीय मतदारांनी पार पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आता भारतीय विकासाचा रथ वेगाने पुढे जाण्याचा मार्ग शसुकर झाला आहे.