Sangli Samachar

The Janshakti News

ऐतिहासिक वटवृक्षाचे अभिनव पध्दतीने होणार जतन| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जून २०२४
मिरज तालुक्यातील भोसे येथील ४०० वर्षे जुना ऐतिहासिक वटवृक्ष सोमवारी पहाटे उन्मळला, त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यावरण प्रेमींनी हा वटवृक्ष त्याच ठिकाणी फांद्या छाटून जतन करण्याचा निर्णय घेतला असून वटवृक्षाच्या फांद्या भोसे, धुळगाव, मिरज आणि बिसुर या ठिकाणी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना पर्यावरण प्रेमींनी हा वृक्ष संवर्धन करण्यासाठी आवाहन केले होते, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्हा परिषद प्रशासन या वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील ७०० गावात लावणार आणि जपणार आहे. या निमित्ताने या ऐतिहासिक वटवृक्षाचे जनुकीय जपणूक होणार आहे.


मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, गट विकास अधिकारी अविनाश पाटील, ग्रामसेवक विनायक मोरे यांनी यलम्मा मंदिर परिसरात वटवृक्ष येथे भेट दिली, यावेळी प्रवीण शिंदे, भोसे सरपंच पर्शवनाथ चौगुले, विकास चौगुले, अमोल गणेशवाडे तसेच वन विभागाचे सह्यायक वन संरक्षक अजित साजने यांच्या सूचनेनुसार वन विभागाकडून वनपाल तुषार भोरे उपस्थित होते.

निधी उपलब्धतेचे आवाहन 

हा वटवृक्ष उन्मळून पडला आहे. हा इतका महाकाय वटवृक्ष आता फांद्या छाटणी, तसेच मूळ बुंदा संगोपन करण्यासाठी निधी उपलब्धता करण्याचे आव्हान आहे. शासकीय मदत, किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निधी साठी मदतीचे आवाहन करण्यात येणार आहे.