| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जून २०२४
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सांगली आणि पर्यावरण संरक्षण गतीविधी महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून रोजी आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत कृष्णा नदी काठावरील व शहरातील ५० महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. या प्रतिनिधींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सहभागातून पर्यावरण जागृती आणि पर्यावरण संरक्षणाचे काम होईल अशी अपेक्षा आहे.
कार्यक्रमाचा प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. मनोज पाटील, मैत्रेयी तिळवे, डॉ. रवींद्र वोरा, अजित गुजराती, प्राचार्या डॉ. अरुंधती वाटेगावे यांचे स्वागत केले.
डॉ. रवींद्र वोरा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी प्रतिज्ञा घेतली. प्रमुख पाहुण्यांचा रोप देऊन सत्कार केला. मैत्रेयी तिळवे यांनी आपले प्रेझेंटेशन दिले. ही कार्यशाळा महत्वपूर्ण प्रवासाचे पहिले पाऊल आहे. राज्यस्तरावर होणाऱ्या 'एन्व्हायर्नमेंट कॉन्सेसनेस प्रोग्रॅम' ही तीन दिवसाची ऑनलाईन कार्यशाळा २७, २८, व २९ जून रोजी असेल. हा दुसरा टप्पा आहे. ही कार्यशाळा पूर्ण केलेल्या व्यक्तीला 'नॅशनल एस. आस. पी.' मध्ये सहभागी होता येईल. हा कार्यक्रमाचा तिसरा टप्पा आहे. नॅशलन एसआयपी मध्ये प्राध्यपकांना मेंटॉर म्हणून काम करता येईल तर विद्यार्थ्यांना सहभागी होऊन प्रमाणपत्र मिळवता येईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 'सिपा' या असोसिएशनचे सदस्य होता येईल. हा या उपक्रमाचा चौथा टप्पा असेल. सिपाचे सदस्यत्त्व मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरती अनेक कार्यक्रमाचा भाग बनता येईल आणि समाजात जाऊन काम करता येईल. हा या उपक्रमाचा पाचवा टप्पा आहे.
डॉ. मनोज पाटील यांनी रियुज, रिसायकल, रिड्युस आणि प्लास्टिकच्या विटा कशा बनवायच्या, घरामध्ये बायोएंझाइम कसे तयार करायचे अशा पर्यावरण संवर्धनासाठी लागणाऱ्या गोष्टींबद्दल प्रेझेंटेशन दिले. अजित गुजराती यांनी मनोगत व्यक्त केले. महानगरपालिका पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. आर्किटेक्ट विनायक रसाळ यांनी आभार मानले.