| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतील मोठा भाऊ ठरलेल्या ठाकरे शिवसेनेला २१ पैकी फक्त ९ जागावर विजय मिळवता आला. त्याचवेळी काँग्रेस पक्षाने १७ पैकी १३ जागावर विजय मिळवून मोठे आघाडी घेतली. तर शरद पवार राष्ट्रवादीने त्या पाठोपाठ ६ जागा काबीज केल्या. ठाकरे शिवसेनेपेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट जास्त असल्याने आता विधानसभेमध्ये ठाकरे सेनेला छोट्या भावाची भूमिका व्यवहारी लागणार आहे. साहजिकच इच्छुक उमेदवारांची व शिवसैनिकांची नाराजी पक्ष नेतृत्वाला स्वीकारावी लागू शकते. यातून अनेक जण बंडाचा झेंडा हाती घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच विधानसभेत काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे म्हटले होते. याला तात्काळ प्रतिउत्तर देत खा. संजय राऊत यांनी निवडणुकीत मोठा भाऊ छोटा भाऊ असे काही असणार नाही. जिथं ज्या पक्षाची ताकद जास्त त्या पक्षाचा उमेदवार, असा फॉर्म्युला ठरला असल्याचे म्हटले होते.
आता शरद पवार यांनी या वादात उडी घेत, लोकसभेत भाजपला रोखण्यासाठी मी दोन पावले मागे आलो. परंतु आता आपल्याला राज्य हाती घ्यायचे आहे त्यामुळे कोणी अडून बसू नये अप्रत्यक्षरित्या ठाकरे शिवसेनेला अशा कान पिचक्या दिल्याने, विधानसभा निवडणुकीत मोठे घामासान पाहावयास मिळणार आहे हे नक्की.