Sangli Samachar

The Janshakti News

इंडिया आघाडीची बैठक संपन्न.इतक्या जागा येण्याचा व्यक्त केला अंदाज !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २ जून २०२४
इंडिया आघाडीची मतमोजणीच्या दिवसापर्यंतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय पक्षांच्या नेत्यांची आज अनौपचारिकपणे बैठक आज संपन्न झाली. अजूनही लढत संपलेली नसून सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते कमालीचे सतर्क असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीनंतर २९५ जागा इंडिया आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार असून विविध मुद्द्यावर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले की, आमच्या सर्व शक्तीनिशी लढलो आहोत आणि भारतातील जनतेने आम्हाला पाठिंबा दिल्याने सकारात्मक परिणामाची खात्री असल्याचे म्हणाले.बदलेगा भारत, जीतेगा भारत असे ते म्हणाले.


राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण देश ढवळून काढला असून, मोदी सरकारने देशावर लादलेल्या कर्जाचा व महागाईचा तसेच बेरोजगारीचा मुद्दा अतिशय समर्पकपणे मांडल्याने मतदारांचा कल इंडिया आघाडीकडे राहिलेला आहे असेही ते म्हणाले. आघाडीतील इतर पक्षांनीही अतिशय तुलनात्मक प्रचार केला. देश पातळीवरील तसेच स्थानिक पातळीवरील मुद्दे प्रचारात अतिशय मुद्देसूदपणे मांडल्याने व मतदार मोदींच्या कार्यावर नाराज असल्याने इंडिया आघाडी निश्चितपणे चांगली कामगिरी करेल असेही त्यांनी नमूद केले.