| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जून २०२४
येथील विलिंग्डन महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक प्रा. सुनिता मोटे-जाधव यांना शिवाजी विद्यापीठाची मराठी विषयातील पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय 'मराठी आणि कन्नड नवकथाः तौलनिक अभ्यास' असा आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,पलूस येथील प्रा. डॉ. संपतराव पार्लेकर हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, प्रा.डॉ.रणधीर शिंदे, विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, प्रा.डॉ. विष्णू वासमकर यांचे प्रोत्साहन लाभले.