yuva MAharashtra मिरज शहर पत्रकार संघातर्फे डॉ. नणंदकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल ह्रद्य सत्कार !

मिरज शहर पत्रकार संघातर्फे डॉ. नणंदकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल ह्रद्य सत्कार !


सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २८ जून २०२४
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ सुधीर नणंदकर हे सेवानिवृत्त झाल्यामुळे मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.

यावेळी मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे, दै. लोकमतचे जेष्ठ पत्रकार सदानंद औंध्ये, दै. प्रतिध्वनीचे संपादक सुकुमार पाटील, दै. केसरीचे पत्रकार मोहन वाटवे, योगेश कुलथे, दै. तरुण भारतचे युवा पत्रकार प्रशांत नाईक, लोकतंत्र न्यूजचे संपादक अर्जुन यादव, दै. प्रतिध्वनीचे जाहिरात विभाग प्रमुख सुशांत नलवडे हे यावेळी उपस्थित होते.

डॉ सुधीर नणंदकर यांनी आपल्या कार्यकाळात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तसेच या भावी डॉक्टर बनणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मोलाचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची मनोभावे सुश्रुषा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. वैद्यकीय महाविद्यालय असो वा शासकीय वैद्यकीय रुग्णालय डॉक्टर नणंदकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. रुग्णालयातील सर्वच स्टाफ यांनाही त्यांचे संपूर्ण सहकार्य होते.