Sangli Samachar

The Janshakti News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन संपन्न !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० जून २०२४
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन आहे, यानिमित्ताने सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे झेंडावंदन करून साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिम्मित राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या सूचनेनुसार सकाळी ठीक १० वाजून १० मिनिटाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल चे सांगली शहराध्यक्ष मा.दत्ता पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी ते म्हणाले की, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब यांच्या मुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठे यश मिळाले आहे, तसेच शरदचंद्र पवार साहेबांनी १९९९ साली स्थापन केलेल्या आज आपल्या पक्षाचा २६ वा वर्धापन दिन आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी संपूर्ण राज्यात पक्षबांधणीचे काम मोठ्या प्रमाणे केले आहे, व तसेच शहरजिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार हे देखील मनपा क्षेत्रात मोठ्या प्रमाणे संघटना बांधणी केली आहे,आपण सर्वांनीच अजून मोठ्या प्रमाणात काम करत राहून पक्ष वाढी साठी प्रयत्न करू, असे ही ते म्हणाले व सर्वांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहराध्यक्ष मा.सागर घोडके, समीर कुपवाडे, मुश्ताकअली रंगरेज, आयुब बारगिर ,युवराज गायकवाड , संजय औंधकर , डॉ शुभम जाधव, डॉ सतीश नाईक , दत्ता पाटील ,आशा पाटील , संगिता जाधव ,सूरेखा सातपुते ,स्वाती शिरूर, कुमार वायदंडे ,अर्जुन कांबळे,फिरोज मुल्ला, नंदकुमार घाडगे, प्रकाश सूर्यवंशी, सुभाष तोडकर , विक्रमसिंह शिंदे, जुबेर मुजावर, आकाराम कोळेकर, वाजीद खतीब, शीतल खाडे, घनश्याम थोरात,संतोष शिंदे, संतोष कांबळे, अभिजित रांजणे,राहुल यमगर, संजय सुंगारे, प्रदीप पाटील, आदर्श कांबळे ,इमानुएल मद्रासी आदी पदाधिकारी उपस्थित होते.