| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जून २०२४
सध्या टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यानुसार, अनेक अॅप्स, गॅजेट्सही लाँच केले जात आहेत. असे असताना 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' अर्थात AI चा वापरही वाढताना दिसत आहे. इतकेच काय तर तुम्हाला जर फोन आला तरी AI तुमच्या आवाजात बोलणार आहे.
TrueCaller ही सुविधा घेऊन येत आहे. कॉलर आयडी सर्व्हिस ट्रूकॉलर लवकरच लोकांना AI व्हर्झनची सुविधा देणार आहे. युजर त्यांच्या AI व्हर्झनमध्ये त्यांचा खरा आवाज रेकॉर्ड करू शकतील. यामुळे फोन आल्यावर AI च्या मदतीने हुबेहुब तुमच्या आवाजात हा AI Voice Assistant बोलेल.
AI असिस्टंट हे फीचर लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. या फीचरच्या माध्यमातून कॉल रिस्पॉन्स करण्यासाठी विशेष सेवा घ्यावी लागणार आहे. ही सेवा मोफत नसून, पैसे देऊन अर्थात पेड सर्व्हिस असणार आहे. त्यासाठी कंपनीकडून सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. कंपनी नवीन व्हाईस असिस्टंट फीचरची सुरुवात भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, स्वीडन आणि चिलीमध्ये करणार आहे.