Sangli Samachar

The Janshakti News

"भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार": विशाल पाटील https://dhunt.in/UljO8



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२४
भाजपाला पराभव दिसू लागला आहे. माझ्या मागे लाखो अदृश्य हात आहेत. हे हात निकालापर्यंत आणि निकानंतरही माझ्यासोबत राहतील. माझा जनतेवर विश्वास आहे. जनतेने ठरवले आहे. विजय माझा नाही, जनतेच्या उद्रेकाचा विजय होणार आहे. प्रचंड मताधिक्क्याने मी १०० टक्के विजय होणार आहे. काँग्रेसवर प्रेम करणारे प्रत्येक कार्यकर्ते नेते मनाने माझ्याबरोबर आहेत. विशाल पाटील आपलाच उमेदवार आहे अशी लोकांच्या मनात भावना आहेत, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

सांगली जागेवर काँग्रेसने दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अचानक जाहीरपणे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाला. शेवटपर्यंत चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे विशाल पाटील यांनी पक्षादेशाविरोधात जात अपक्ष म्हणून अर्ज भरला. आता विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रचारसभेत बोलताना, विश्वजीत कदम हे राज्याचे नेते आहेत. काँग्रेस पक्षाचे भविष्य आहेत. निकाल काहीही लागो, आम्ही विश्वजीत कदम यांचे नेतृत्व शेवटपर्यंत मान्य करणार आहोत, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


आम्ही वसंतदादांच्या विचारांची लोक आहोत. एकदा निर्णय घेतला की, त्यावर ठाम राहतो. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारीमुळे मला पराभव स्वीकारावा लागला. मात्र या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझे काम करत आहे. ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या बाजूने वारे निश्चितपणे फिरले आहे. या वाऱ्याचे आता वादळ झाले आहे. त्यामुळे लोक आता भाजपच्या सत्तेला पूर्णपणे हद्दपार करणार आहेत. भाजपला पराभव दिसू लागला आहे. राज्यातील आणि देशातील नेते सांगलीत येऊन अपक्ष उमेदवारावर बोलतात. यातूनच कळते की, विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.