Sangli Samachar

The Janshakti News

राऊताना बहुतेक शिवसेनेचा उमेदवार पाडायचा असावा...| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२४
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना बहुतेक महाआघाडीचा अर्थात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करायचा असावा. आणि म्हणूनच आघाडी धर्म पाळत असलेल्या डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर शाब्दिक वाक् बाण सोडत आहेत.

सांगलीत आल्यापासून संजय राऊत हे डॉ. विश्वजीत कदम आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना टार्गेट करीत आहेत. मध्यंतरी त्यांनी मावळ भूमिका घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्यातील विरोधक जागा झाला असावा. पण करीत असलेल्या बाष्फळ बडबडीने आपल्याच उमेदवारासाठी पराभवाचा खड्डा खणत आहोत, याची जाणीव न असण्याइतपत ते निश्चितच अपरिपक्व आहेत. तरीही ते डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर का टीका करीत आहेत. याचा उलघडा होत नाही.

पलूस येथे नुकत्याच झालेल्या, प्रचार सभेमध्ये डॉ. विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून, " तुम्ही महाराष्ट्राचे वाघ असाल, तर आम्ही सांगलीचे वाद आहोत." असे म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर पलटवार करीत, "वाघ हा समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही, सांगलीतला वाघ कोण हे ४ जूनला निकालानंतर कळेल." असा टोलाही उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांना लगावत प्रतिउत्तर दिले आहे.

आता यामुळे जर डॉ. विश्वजीत कदम यांच्या कार्यकर्त्यांनी उट्टे काढायचे ठरवले, तर काय परिणाम होईल हे वेगळे सांगायला नको. मग पुन्हा आघाडी धर्म मोडला म्हणून उलट्या xxx मारायला हे मोकळे.