Sangli Samachar

The Janshakti News

"लाखापार वाचक संख्येसह सांगली समाचार साता समुद्रापार !"





सांगली समाचार !...

स्व. एन्. बी. सरडे यांनी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन १९७२ साली समाचारची मुहूर्तमेढ रोवली. १९७२ ते १९९२ सांगली समाचार ची वाटचाल तशी खडतरच राहिली.

पण, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सांगली समाचार नव्या पिढीच्या सोशल मीडिया वरून 'वेबपोर्टल' स्वरूपात प्रकाशित होऊ लागला. आणि अवघ्या चार महिन्यात एक लाख वाचकसंख्येचा टप्पा ओलांडलेल्या सांगली समाचारने सातासमुद्रापार झेप घेतली हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. आणि याचे श्रेय संपूर्णपणे आमच्या वाचकांचे, हितचिंतकांचे आहे, हेही नम्रपणे मान्य करावे लागेल. आणि या सर्वांना असंख्य धन्यवाद द्यावे लागतील !

एखाद्या मोठ्या दैनिकासाठी अथवा न्यूज चॅनेल साठी ही वाचक संख्या कदाचित छोटीही असू शकेल. परंतु नव्याने सोशल मीडियावर दाखल झालेल्या सांगली समाचारची ही अवघ्या चार महिन्यातील वाटचाल आमच्या सारख्या नवख्यांना निश्चितच प्रोत्साहनात्मक म्हणावी लागेल...

असो, १९७२ ते २०२४ या प्रवासात सांगली समाचार ने स्वतःची प्रतिष्ठा निर्माण केली आहे. या पुढील काळात ही प्रतिष्ठा जपण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातील हा विश्वास व्यक्त करून पुढील प्रवासात असाच स्नेह कायम राहावा हे नम्र विनंती !

पुनश्च एक वेळेस सर्वांना शतशत धन्यवाद !

🖋️ संपादक |
      रमेश नेमिनाथ सरडे

🖋️ कार्य. संपादक |
      चंद्रकांत राजाराम क्षीरसागर

खालील ग्राफिक्स वरून पहा विश्लेषण