Sangli Samachar

The Janshakti News

राजकीय नेत्यांनी प्रचारात समाजाच्या नाजूक आराखडयाला हानी पोहचवू नये - निवडणूक आयोग



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १७ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांमध्ये स्टार प्रचारक, राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी चांगले उदाहरण मांडावे आणि समाजाच्या नाजूक आराखड्याला हानी पोहोचवू नये, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. 

निवडणूक आयोगावर नागरी समाजाचा दबाव वाढत आहे. चार टप्प्यातील निवडणुकीनंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबत शंका-कुशंका असताना सुजाण नागरिकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आयोगाची भेट घेतली.


हे शिष्टमंडळ 4000 सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन घेऊन आयोगाकडे पोहोचले. त्यांची मागणी होती की फॉर्म 17 सी च्या भाग एक नुसार मतदानाचा डेटा सार्वजनिक केला जावा. त्यावरून हे विधान आले आहे की, अनेक नेत्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवरून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.