Sangli Samachar

The Janshakti News

निवडणूक वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकाराचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. १३ मे २०२४
बीडमध्ये लोकसभा निवडणूकीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या आज तक या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वैभव कनगुटकर असे पत्रकाराचे नाव आहे. ते मुंबईहुन निवडणूक वार्तांकनासाठी अंबोजोगाईला आले होते. १३ मे रोजी सोमवारी सकाळी ते हॉटेलमधून बाहेर पडले. पण अस्वस्थ वाटत असल्यामुळे ते पुन्हा गाडीत बसले. त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे दु:खद निधन झाले.