Sangli Samachar

The Janshakti News

भाजपप्रणित एनडीए २७२ ही मॅजिक फिगर तरी गाठू शकणार का ? पृथ्वीराज चव्हाण !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ मे २०२४
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप २२० ते २५० जागा जिंकेल, एनडीएला २७२ हा बहुमताचा आकडाही पार करता येणार नाही. २०१९ मध्ये बहुतांश राज्यांमध्ये भाजपचा परफॉर्मन्स इतका चांगला होता की, आता त्यांना वर जायला जागाच शिल्लक नाही. असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, या राज्यांमध्ये भाजपलाव वर जायला आता जागाच नाही. त्यामुळे त्याठिकाणी झाल्या तर भाजपच्या जागा कमीच होतील. याचा फटका भाजपला बसेल. माझ्या मते देशातील सहा राज्यं महत्वाची आहे. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या सहाही राज्यात भाजपच्या जागा कमी होतील. परिणामी भाजपप्रणित एनडीए २७२ ही मॅजिक फिगर गाठू शकणार नाही. असा दावा देखील त्यांनी केलाय.


दरम्यान, नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नसेल. महाराष्ट्राची जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांवर चालते. शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभावाचे सर्वात मोठं प्रतीक आहेत. असेही ते म्हणाले.