Sangli Samachar

The Janshakti News

राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीत तिकिट विक्रीत उच्चांक; प्रतिफेरी उत्पन्न ७० हजारावर



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२४
मध्य रेल्वे प्रशासनाने सांगली स्थानकावरुन सुटणारी पहिली एक्सप्रेस म्हणून राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला हिरवा कंदिल दाखविल्यानंतर प्रवाशांनी या गाडीला मोठा प्रतिसाद दिला आहे. सांगली स्थानकावरुन या गाडीचे प्रतिफेरी उत्पन्न ७० हजार ३३० इतके नोंदले गेले आहे.

सांगली-बंगळुरू चेन्नम्मा एक्सप्रेसच्या माध्यमातून सांगली रेल्वे स्थानकाला पहिलीच एक्सप्रेस मिळाली आहे. यापूर्वी एकही एक्सप्रेस सांगलीतून सुटत नव्हती. त्यामुळे येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पुण्याखालोखाल सांगली रेल्वे स्थानकातून तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणावर होते. आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न देणारे हे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकावरून नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी होती. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसच्या माध्यमातून पहिली गाडी मिळाली आहे. याच गाडीला सांगली स्थानकावरुन प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत असून आरक्षित तिकिट विक्रीने शतकी उंबरठा ओलांडला आहे.
चौकट

आरक्षित तिकिटांना प्रतिसाद

सांगली-बेंगळुरू राणी चेन्नम्मा एक्सप्रेससाठी २ मे रोजी सांगली स्थानकावरुन ११३ आरक्षित तिकिटांचे बुकिंग झाले. त्यातून प्रति फेरी ७० हजार ३३० रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले.


टू टिअर एसीची ७, थ्री टिअर एसीची १९, तर स्लिपरच्या ८८ तिकिटांचे बुकिंग करण्यात आले.
याशिवाय सामान्य आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून ३ हजार ३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले.

तिकिटांचा मोठा कोटा

सांगली स्थानक ते बंगळुरूपर्यंत ५६९ तिकिटांचा कोटा मिळाला आहे. www.irctc.co.in या संकेतस्थळावर किंवा सांगली स्थानकावरुन तिकीट बुकिंग करता येते. त्यामुळे सांगलीतून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
चौकट

बुकिंगसाठीचा सांगलीतून कोटा
स्लीपर क्लास - २८८ तिकीट
एसी स्लीपर - ८९
एसी स्लीपर फर्स्ट क्लास स्वतंत्र केबिन - १०

२५ थांबे मंजूर -

सांगली ते बंगळुरूदरम्यान ही गाडी २५ स्थानकांवर थांबते. या गाडीत २१ डबे असून स्लीपर क्लासचे १०, एसी स्लीपरचे ४, एसी प्रथम दर्जाचे २ व अनारक्षित प्रवाशांसाठी ३ जनरल डबे आहेत. या गाडीत अनारक्षित जनरल तिकीट खरेदी करून जनरल डब्यातही प्रवास करता येईल.