| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० मे २०२४
सांगली येथील विश्रामबाग मध्ये कॅफे हाऊस मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला म्हणून दोन दिवसापूर्वी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी 'कॅफे'च्या केलेल्या तोडफोड केली होती. या कार्यकर्त्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यामुळे समाजातून तीव्र नाव पसंतीही व्यक्त होत आहे. आता या कॅफे हाऊस विरोधात राष्ट्रवादीचे आमदार अरुण अण्णा लाड आणि शिवसेनेच्या गुंठेवारी विकास समितीचे राज्यप्रमुख चंदन चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सुसंस्कृत सांगली येथे पोलीस आणि प्रशासन यांच्या पाठबळानेच असले धंदे चालू आहेत. अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक नाही. पोलीस हप्ते घेत असल्यानेच कारवाई होत नाही. शहरासह गल्लीबोळात चालू झालेली 'कॅफे' संस्कृती त्वरित थांबवावी. संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांनी दिली आहे.
चंदन चव्हाण म्हणाले की, आम्ही गृहमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला जातो. मुलींना ब्लॅकमेल केले जाते. याकडे पोलिसांचे लक्ष का नाही ? महिला निर्भया पथकाकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे. पथकाला पुन्हा प्रभारित केले पाहिजे. निष्क्रिय पोलीस अधिकार्यांना पदमुक्त करा. सांगली येथील प्रकार राज्य सरकारला लाजेने मान खाली घालायला लावणारा आहे. या कॅफेवाल्यांना कुणाचे अभय आहे ? पुढील ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. कॅफेमालकांवरही गुन्हे नोंद करावेत. पोलिसांनी कठोर कारवाई केली, तरच आंदोलन थांबवू असे म्हटले आहे.