Sangli Samachar

The Janshakti News

"परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन..." अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला देवेंद्र फडणवीसांचा फिल्मी स्टाईलमध्ये रिप्लाय| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ मे २०२४
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन म सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि या माध्यमातून ते त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान आता अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले आहे, या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. खरे तर बिग बींनी अलिकडेच केलेल्या ट्विटमध्ये जुहू ते मरिन ड्राइव्ह ३० मिनिटात पोहचल्यामुळे आनंद व्यक्त केला. त्यावर फडणवीसांनी रिप्लाय दिला आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'ओह! एका चांगल्या बदलानंतर वेळापत्रकाच्या अगोदर काम करण्यासाठी थोडा जास्त वेळ मिळाला. जुहू ते मरीन ड्राइवपर्यंतचा प्रवास फक्त ३० मिनिटांचा. व्वा, क्या बात है! स्वच्छ आणि नवीन छान रस्ता, कोणताही अडथळा नाही.' या शब्दांत ट्विट करत बिग बींनी कोस्टल रोडचे कौतुक केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिप्लाय दिला आहे. त्यांनी म्हटले की, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, ये इस सरकार के तीन स्तंभ है। ये वो आदर्श है जिन से हम भारतीयों का कल बनाते है....। प्रवासाची स्टोरी शेअर केल्याबद्दल अमिताभ बच्चन जी, तुमचा आभारी आहे. मुंबई बदलतेय,आम्ही मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ कसा कमी करता येईल यावर काम करत आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.


अमिताभ बच्चन वर्कफ्रंट

अमिताभ बच्चन त्यांचा लोकप्रिय रिॲलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'च्या नवीन सीझनमध्ये व्यस्त आहेत. तसेच ते नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी' मध्ये अश्वत्थामाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. यात प्रभास, कमल हासन आणि दीपिका पादुकोण यांच्याही भूमिका आहेत.