Sangli Samachar

The Janshakti News

बारामतीत निवडणूक आयोगाविरुद्धच आचारसंहिता भंगाची तक्रार



| सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि. ८ मे २०२४
निवडणुकीत आचारसंहितेचे पालन होते की नाही, हे पाहण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. मात्र, निवडणूक आयोगानेच आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार बारामतीत दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवाराच्या चिन्हाला जबाबदार धरण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडूनच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयोगाकडे बारामतीचे ॲड. तुषार झेंडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील एका उमेदवाराचे चिन्ह सीसीटीव्ही आहे. आज निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवले होते. याबाबतची माहिती मतदान केंद्रावर दर्शनी भागात लावली होती. ॲड. तुषार झेंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार जे चिन्ह उमेदवाराचे आहे त्या चिन्हाचाच प्रचार व प्रसार प्रत्येक मतदान केंद्रावर होत असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे.


जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना वास्तविक जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना जाहीररित्या त्यांच्या चिन्हाचा प्रचार करता येत नाही. मात्र निवडणूक आयोगाने एका उमेदवाराचे चिन्ह सीसीटीव्ही असताना देखील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावत अप्रत्यक्ष त्या उमेदवाराचा प्रचारच केला, असा आक्षेप ॲड. तुषार झेंडे यांनी घेतला. हे चिन्ह गोठविले गेले नाही त्यामुळे त्या चिन्हाचा प्रचार आयोगानेच केला असेच चित्र निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ॲड. झेडे यांनी निवडणूक आयोगाविरुद्धच आचारसंहिता भंगाची तक्रार केल्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे