| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ मे २०२४
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या मनोरंजक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या अर्जुन व सायली यांच्या कॉन्ट्रक्ट मॅरेजबद्दलचे कथानक सुरु आहे. आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, चैतन्य साक्षीकडे सँडविच खायची इच्छा व्यक्त करतो. त्यानंतर ती सँडविच करायला निघून जाते, तेव्हा चैतन्य लगेच तिचा फोन तपासण्यासाठी पासवर्ड टाकायचा प्रयत्न करतो.
चैतन्य पासवर्ड तपासताना महीपतचा साक्षीला फोन येतो. शिवाय महीपत मधुभाऊंबद्दल नवीन काहीतरी कटकारस्थानाचं बोलल्याचंही ऐकतो, पण संशय येऊ नये म्हणून चैतन्य फोन कट करतो. त्यापुढे, महीपतकडे जेलमध्ये फोन कसा ? असा विचार चैतन्य करतो. त्याचबरोबर चैतन्य अर्जुनला महीपतकडे जेलमध्ये मोबाईल असल्याचे मॅसेजद्वारे सांगताना नेमकी साक्षी येते आणि चैतन्यचा मोबाईल हिसकावून घेते. त्यावर चैतन्य साक्षीची यापुढे तिच्यासमोर मोबाईलकडे बघणारही नसल्याची माफी मागतो आणि मोबाईल परत घेतो.
एकीकडे सायली दिनदर्शिकेवर तारीख नोंद करून अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला दोनच दिवस उरले असल्याची आठवण करून देते. यानंतर ती निघून जात असताना अर्जुन तिला अडवायला जातो आणि त्याला ठेच लागते. यावर सायली अर्जुनला लगेच मलम लावून देते आणि अर्जुनला "मी आहे तोवर मलम लावून देईन नंतर कोण आहे ?" असं म्हणते. त्यावर अर्जुनही सायलीला खरंच दोन दिवसांनी निघून जाणार असल्याचं विचारतो.
यापुढे सुभेदारांच्या घरात काकरे भगिनींची एन्ट्री होताना दिसणार आहे. पूर्णा ताईच्या आम्ही बहिणी असल्याचं त्या दोघी सायलीला सांगतात आणि पूर्णाताईला सरप्राईज द्यायला आल्याचं त्या सांगतात. पूर्णाआईसुद्धा त्यांना बघून आनंदी होते. त्या दोघी पूर्णाआईला मंगळागौरीचा ग्रुप जॉईन करायला सांगतात.
दरम्यान, गेले काही दिवस अर्जुन-सायली यांचे प्रेम बहरतानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. मात्र आता हे दोघे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत की काय ? याबद्दल प्रेक्षकांना जाणून घेण्यात उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आगामी भागांत अर्जुन-सायली कॉन्ट्रक्ट मॅरेजनुसार खरंच एकमेकांपासून वेगळे होणार की ? त्यांच्यातील प्रेम पुन्हा बहरणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.