Sangli Samachar

The Janshakti News

अल्पवयीन आरोपीच्या जामीनाच्या आदेशावर सही देणारे जज नव्हे तर...; याप्रकरणातही चौकशीची शक्यता



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २८ मे २०२४
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नियमित कोर्टातील न्यायाधिश गैरहजर असताना अल्पवयीन आरोपीचा जामीन झालेला आहे. अल्पवयीन आरोपीला जामीन देणारे न्यायाधिश त्या दिवशी खासगी सदस्य होते. खासगी सदस्य असलेल्या न्यायाधिशांची जामीनाच्या आदेशावर सही आहे. जामीन देणाऱ्या त्या खासगी सदस्यांच्या चौकशीची शक्यता वर्तवण्यात येते आहे. 

पुणे अपघात प्रकरणात नियमित कोर्टाचे न्यायाधिश गैरहजर असताना अल्पवयीन आरोपीचा जामीन करण्यात आला होता. अल्पवयीन आरोपीला जामीन देणारे न्यायाधिश त्या दिवशी खासगी सदस्य होते. खासगी सदस्य असलेल्या न्यायाधिशाची जामीन अर्जावर सही आहे. सही देणाऱ्या या सदस्यांची या प्रकरणात चौकशीची शक्यता आहे, कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणी अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. या संबधीचे वृत्त टिव्ही ९ मराठीने दिले आहे. अपघात झाल्यानंतर काही तासांमध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. आत्तापर्यंत आरोपीला अनेकदा वाचवण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. या जामीन प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप आहे का हे तपासले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आरोपीचे ब्लड सॅम्पलबाबत खुलासा

कल्याणीनगर अपघाताप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे. ससूनच्या दोन डॉक्टरांनी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्या म्हणण्यानुसार ब्लडचा रिपोर्ट बदलला असल्याचं समोर आलं आहे. अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे ब्लड गोळा करण्यात आले होते, ते दुसऱ्या व्यक्तीचे होते. तेच ब्लड फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. आरोपीचे ब्लड सॅम्पल ससूनच्या डॉक्टरांनी घेऊन ते डस्टबीनमध्ये फेकले. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यावर आरोपीचे नाव लिहून तेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले, असा धक्कादायक खुलासा आयुक्तांनी केला आहे. श्रीहरी हरलोर यांनी ब्लड सॅम्पल घेतले आणि रिप्लेस केले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. अजय तावरे याला देखील अटक करण्यात आली होती. तावरे याच्या आदेशानेच हरलोर याने काम केले आहे. आम्हाला शंका असल्याने आरोपीचे ब्लड सॅम्पल आम्ही औंधच्या हॉस्पिटलला देखील पाठवले होते, असं आयुक्त कुमार म्हणाले.