Sangli Samachar

The Janshakti News

मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या लेखनाची अमेरिकेतून दखल;



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ मे २०२४
वरिष्ठ पत्रकार मुंबई अनिलभाऊ महाजन यांच्या पत्रकारितेच्या लिखाणाच्या उल्लेखनीय कामगिरीची थेट अमेरिकेतील मराठी मंडळाने दखल घेतली आहे. अमेरिकेतील मराठी मंडळाच्या उपक्रमाच्या कार्यक्रमाचे आर्टिकल लिहण्याची संधी अनिल महाजन यांना चालून आली आहे. अनिल महाजन हे एक ग्रामीण भागातून आले  असून ते  खान्देशतील जळगावचे आहेत. अनिल महाजन यांनी त्यांच्या जीवनात अनेक मान अपमान सहन केले अतिशय कष्टातून पुढे आलेला हा युवक आहे. छोट्याशा गावातून पत्रकारिता सुरू करून आज मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये राज्य मंत्रिमंडळ बसत असलेल्या मंत्रालयामध्ये आज ते वरिष्ठ पत्रकार म्हणून काम करत आहेत. मंत्रालय विधिमंडळाचे ते वरिष्ठ पत्रकार आहेत. तसेच यांचे गर्जा महाराष्ट्र न्यूज या नावाने मराठी चॅनल आहे. हे ऑनलाईन चॅनल असले तरी यांच्या लेखणीची चुणूक देशभरात आहे.

अनेक वैचारिक पातळीचे राजकीय सामाजिक अधिकारी वर्गात यांचे आर्टिकल आणि लेख वाचले जातात. अनिल महाजन यांचे लिखाण दखलपात्र असते.अनिल महाजन यांनी एखाद्या विषयासाठी आर्टिकल लिखान करणं म्हणजे त्याची दखल सर्व ठिकाणी घेतली जाते हीच यांच्या कामाची पावती आहे. ते अतिशय अभ्यासू सोज्वळ मनमिळाऊ व्यक्तिमत्व आहेत.


अमेरिका हा एक प्रगत देश आहे यातील लोक अतिशय बुद्धिजीवी आहेत आणि अशा लोकांकडून अनिल महाजन यांच्या कार्याची दखल घेणे म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि पत्रकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच लिखाण अतिशय मार्मिक अभ्यासू आहे.

पंढरपूरची विठू माऊली पांडुरंगावर अमेरिकेतील या देशातील मराठी मंडळाने एक अभंग लिहिला आहे आणि तो अभंग जगभरात मराठी मध्ये त्याचे वर्णन अनिल  महाजन  यांनी यांच्या लेखणी द्वारे आर्टिकल लिहावे अशी मागणी या ऑर्लँडो, (राष्ट्र फ्लोरिडा, देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) येथून मराठी भजनी मंडळाच्या सदस्यांनी केली केली आहे.