Sangli Samachar

The Janshakti News

तेजस ठाकरेंनी थेट हिमालयात शोधली नवी प्रजाती !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ मे २०२४
:माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिंरजीव तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने आणखी एका नव्या प्रजातींचा शोध लावला. गेल्या काही वर्षात त्यांनी सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यात जाऊन संशोधन करत अनेक दुर्मिळ प्रजाती उजेडात आणल्या आहेत. यामध्ये साप, खेकडा, पाल आणि सरडा यांचा समावेश आहे. आता थेट अरुणाचल प्रदेशात जाऊन त्यांनी सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे.

आणखी एक प्रजात उजेडात

तेजस उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमकडून आणखी एका नवीन सरड्याच्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशात ओळखल्या जाणाऱ्या जपलुरा मिक्टोफोला या सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने शोध लावला आहे. ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशनने शोधलेली नवीन प्रजाती हिमालय आणि इंडो-बर्मा प्रदेशात आढळणाऱ्या जपलुरा वंशातील आहे. 'मिकटोफोला' या प्रजातीचे नाव ग्रीक शब्द 'मिकटोस' (म्हणजे मिश्रित) आणि 'फोला' (म्हणजे स्केल) याला एकत्र केले आहे. तेजस ठाकरे यांनी या आधी अनेक दुर्मिळ पाली, खेकडे आणि सरडे यांच्यावर संशोधन केलंय.


संशोधनात अनेक पालींचा समावेश

यापूर्वी तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने अनेक दुर्मिळ पालींचा शोध लावला. यामध्ये निमास्पिस टायग्रीस, निमास्पिस सक्लेशपुरेनासिस, निमास्पिस विजयाई आणि इतर पालींच्या नवीन प्रजातींचा समावेश आहे. अशा जातीच्या प्रजाती भारतासह श्रीलंका, थायलंड, सुमात्रासह इतर बेटांवर आढळून येतात. आतापर्यंत पालीच्या भारतातील 68 प्रजाती समोर आल्या आहेत. त्यात तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमच्या संशोधनाची भर पडली आहे.

सह्याद्रीत शोधली सोनेरी माशाची प्रजात

तेजस ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रागांतील अंबोली घाटात माशाची चौथी नवीन प्रजाती समोर आणली होती. हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या माशाचा शोध त्यांनी लावला. त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या आहेत. मागल्या वर्षी त्यांनी 10 नवीन प्रजातींना जगासमोर आणलं आहे.