Sangli Samachar

The Janshakti News

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पहिल्या ५ टप्प्यांची आकडेवारी जाहीर !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २५ मे २०२४
केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने फॉर्म १७ सीच्या द्वारे गोळा केलेली माहिती प्रसिद्ध केली आहे. आयोगाने प्रत्येक मतदारसंघा निहाय आकडेवारी जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने फॉर्म 17 सी च्या द्वारे गोळा केलेली पहिल्या पाच टप्प्यांची आकडेवारी जाहीर केली. ही आकडेवारी मतदारसंघनिहाय जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातील याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आयोगाने आकडे जाहीर केले आहे. आयोगाने उशीरा आकडेवारी जाहीर करणार असल्याने त्यात काही गडबड आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर आता आयोगाने सर्व मतदारसंघानुसार आकडेवारी जाहीर केली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के मतदान झालं. तर दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यात ६५.६८ टक्के मतदान झालं. चौथ्या टप्प्यात ६९.१६ टक्के मतदान झालं. पाचव्या टप्प्यात ६२.२० टक्के मतदान झालं. 


निवडणूक आयोगाने काय दावा केला ?

निवडणूक आयोगाच्या टक्केवारीत काही बदल झाला नाही. निवडणूक प्रक्रियाचं काम बिघडणवण्यासाठी खोटे आरोप केले. लोकसभा निवडणुकीचा टप्पा झाल्यानंतर ४८ तासांनी डाटा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेबसाईटवर अपलोड करणे शक्य नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मने मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने आज ५ टप्प्यांची आकडेवारी जाहीर केली.