Sangli Samachar

The Janshakti News

प्रकृती अस्वस्थतेमुळे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द



| सांगली समाचार वृत्त |
बारामती - दि. ६ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे आजचे (दि.6 मे) सर्व कार्यक्रम प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द झाले आहेत. 
तसेच,कात्रज येथे होणारी नियोजित सभा आणि इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले असून याची सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी नोंद घ्यावी असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्यातर्फे जाहीर सूचना करण्यात आली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी राज्यभर सभा, रोड शो, कोपरा सभा, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्यामुळे त्यांनी उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना पुढील नियोजित सभांविषयी अधिक माहिती लवकरच कळविण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे.