Sangli Samachar

The Janshakti News

अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव विभव कुमार विरुद्ध गुन्हा दाखल| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १७ मे २०२४
दिल्ली मध्ये आम आदमी पार्टीच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या चूकीच्या वर्तनावरील तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आला आहे. या FIR मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव विभव कुमार  यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. FIR मध्ये कलम 354, 506, 509, आणि 323 चा सामावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमारला कथित हल्ल्याच्या संदर्भात 17 मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. "राष्ट्रीय महिला आयोगाने 'DCW प्रमुख स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सचिवावर तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला' अशा मथळ्यातील एका मीडिया पोस्टची स्वतःहून दखल घेतली आहे. पोस्ट मधील वृत्तानुसार स्वाती मालीवाल, राज्यसभा खासदार आणि माजी DCW प्रमुख यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.


दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर स्वाती यांनी आपल्यावरील हा हल्ला हादरवणारा होता असं म्हटलं आहे. रात्री उशिरा त्या दिल्लीच्या एम्स मध्ये दाखल झाल्या आहेत.