Sangli Samachar

The Janshakti News

लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी !



| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरू - दि. ७ मे २०२४
कॉंग्रेस वारंवार देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप करत आहे. अनावश्यक आरोपांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. लैंगिक छळ आणि अश्‍लील व्हिडिओ पेनड्राईव्ह प्रकरणात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नावाचा वापर करण्यावर सत्र न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी खटल्यांचे वृत्त प्रसारित करताना त्यांच्या नावांचा विनाकारण वापर होऊ नये, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत सत्र न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे अश्‍लील व्हिडिओ पेन ड्राईव्ह प्रकरण आणि माजी मंत्री रेवण्णा यांचे महिला छळ आणि अपहरण प्रकरण देशभर जोरदार चर्चेत आले आहे. 


काँग्रेस वारंवार देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप करत आहे. अनावश्यक आरोपांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्‍लील व्हिडिओ पेन ड्राईव्ह प्रकरणात देवेगौडा यांचे नाव विनाकारण वापरू नये, असे वक्कलिग जागृती मंचचे अध्यक्ष के. सी. गंगाधर यांनी म्हटले आहे. देवेगौडा यांचे मन दुखावते, असे याबाबतचे निवेदन पत्रकारांना दिल्याचे गंगाधर यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे नाव कोणीही वापरू नये, अशी विनंती त्यांनी केली.