| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ मे २०२४
एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकांच्या चार टप्प्याचं मतदान झाले आहे. आता चार जूननंतर निवडणुकींचा निकाल कसा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाबबात वेगवेगळे कयास मांडले जात आहेत. एनडीए आणि इंडिया आघाडी आपणच विजयी होणार असा दावा करत आहे. अशातच आता निकालाआधीच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिला आहे.
मुंबईतील एका प्रचारसभेत उद्धव ठाकरे म्हणाले, "नरेंद्र मोदीजी तुम्हाला मी आजच निमंत्रण देतोय. आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपतविधीला तुम्ही या. मी आजच मोदींना निमंत्रण देतोय. तुम्ही म्हणाल आजच का निमंत्रण देतोय? कारण खुर्चीवर माणूस बसलेला असतो तो पर्यंतच त्यांचं महत्त्व असतं. त्यानंतर त्यांना कुणी विचारत नाही."
ठाकरे पुढे म्हणाले, "मला मुद्दामून मोदी आणि शाह यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला बोलावायचं आहे. त्यांना दाखवून दिलं पाहिजे की त्यांनी जे काही दहा वर्षे थापा मारल्या, आता खरं तर चार जून नंतर देशाचे अच्छे दिन सुरु होत आहेत. मोदीजी आणि शाहजी तुम्ही आम्हाला लुटलंत, छळलत तेवढं खूप झालं. जसे आमचे उद्योगधंदे गुजरातला पळवलेत, तसे तुम्ही तुमच्या गुजरातला जा आणि निवांत पडून राहा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.