Sangli Samachar

The Janshakti News

सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येणार, हे विश्लेषण पहाच !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २५ मे २०२४
मोदींची हवा गायब झालीय… अबकी बार तडीपार… भाजप हटाओ देश बचाओ…2024 च्या संपूर्ण निवडणूक प्रचारात आणि मतदानाच्या वेळेसही भाजपच्या विरोधात देण्यात येणाऱ्या या घोषणा… सोशल मीडिया पासून ते लोकांच्यातील चर्चांमध्येही मोदी सरकार जातंय, अशी एकच चर्चा आहे… मोदी 400 नाही तर 200 पण पार करू शकणार नाही, असं या सगळ्याचं म्हणणं… विरोधकांच्या गालावर हे सगळं ऐकून कळी खुलली असेल, तर जरा थांबा… काहीही झालं, लोकांचे अंदाज वेगवेगळे असले तरी 2024 ला येणार तर मोदीच! 

असं भारतातील सर्वात मोठा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीस्ट सांगतोय… मोदी 2019 पेक्षा जास्त जागांनी निवडून येण्यामागची प्रॅक्टिकल कारण काय आहेत ? निवडणुकांचे अवघे दोन टप्पे शिल्लक असताना समोर आलेल्या या विश्लेषणामुळे मोदी विरोधकांची झोप का उडू शकते? तेच सविस्तर पाहुयातभाजपने 400 पार ची तयार केलेली घोषणा ही एक स्टॅटर्जी होती… 4 जूनला मोदी सरकार 2019 पेक्षा जास्त जागा पदरात पाडून सत्तेत येईल, असं स्टेटमेंट केलंय राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या पीके उर्फ प्रशांत किशोर यांनी… प्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये मोदी सरकारच्या कॅम्पेनची जबाबदारी घेतली होती… भाजपला सत्तेत बसवण्या सोबत अनेक लहान मोठ्या राज्यातील निवडणुकाही वेगवेगळ्या पक्षांनी प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने जिंकल्या आहेत… सध्या बिहारमध्ये जनसुराज अभियान चालवणाऱ्या याच प्रशांत किशोर यांना 2024 च्या निकालाचा अंदाज विचारला. तेव्हा त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता येणार तर मोदीच, हे क्लिअर कट सांगून टाकलं…यासाठी त्यांनी काही महत्वाची कारणं देखील दिली…प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच सत्तेत येईल याची केलेली फोड पाहून खरंच मोदींशिवाय सध्यातरी देशासमोर पर्याय नाहीये, याची जाणीव होते….
 
पाठीमागच्या दोन लोकसभा निवडणुका पाहिल्या तर भाजपला जो बहुमताचा आकडा गाठता आला तो उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यातील मिळालेल्या जागांमधून…2019 मध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या त्यापैकी तब्बल 250 जागा या महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब या पट्ट्यातून जिंकल्या…या भागात भाजपला फटका बसताना दिसत असला तरी इथून 50 हून अधिक जागांचं नुकसान भाजपला होईल अशी सध्या परिस्थिती नाहीये…आता दक्षिण आणि पूर्वेकडील 225 जागांपैकी भाजपला केवळ 50 च्या आसपास जागा मिळवता आल्या होत्या. इथंच खरी मेख आहे…उत्तर पश्चिममध्ये भाजपाला फटका बसत असला तरी पूर्व दक्षिणमध्ये भाजपचं व्होट शेअर आणि जागा दोन्ही देखील वाढताना दिसत आहेत. यामुळे उत्तरेतून जो लॉस होतोय तो भाजप आरामात दक्षिणेतून भरून काढू शकते.. हे गणित भाजपला सहजपणे बहुमताच्या जवळ घेऊन जाईल, असं प्रशांत किशोरी यांचं म्हणणं आहे…

विरोधक म्हणतायत मोदींच्या विरोधात नाराजी आहे… नाराजी असू शकते, पण राग नाही… हीच या सगळ्यातील मुख्य अडचण आहे. मोदींना काहीही करून सत्तेतून खाली खेचायचं आहे, अशी तीव्र स्वरूपाची लाट सध्यातरी देशात दिसत नाहीये… विरोधकांच्या इंडिया आघाडीने शेवटच्या दिवसांत जरी जोर लावला असला तरी मोदींना पर्याय म्हणून सक्षम नेत्याची घोषणा अजूनही विरोधकांकडून करण्यात आलेली नाहीये…. त्यामुळे मोदी नाहीतर कोण?, असं भाजपला फायद्याचं ठरणार गणित यंदाही मोदींना प्लसमध्ये ठेवतय… काठावरची जी मत आहेत ती भाजपला आपल्याकडे खेचून घ्यायला यश मिळतंय…त्यामुळे वाईड स्पेअर मोदीं विरोधात चीड, संतापाची लाट आहे.. असं सध्यातरी नाहीये…

अबकी बार चारसो पार असं म्हणत भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक वातावरण निर्मिती केली…सुरुवातीच्या काही टप्प्यात 2019 ला 303 जागा घेतलेल्या भाजपाला आरामात 400 चा आकडा गाठता येईल, अशी चर्चा होती… पण मतदान जसजसं पुढे जात राहिलं तशी भाजप गोत्यात येतंय असं वातावरण दिसलं… यानंतर एकच चर्चा सुरू झाली की भाजप 400 जागा जिंकेल का? भाजपला 400 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर भाजपचा दावा फोल ठरेल… यामुळं भाजप निवडणूक हारेल, असं सगळ्यांना वाटतंय. पण भारतात सरकार बनवण्यासाठी केवळ 272 खासदारांची गरज लागते…मग 273 निवडून आले काय 300 आले काय किंवा 400… सरकार बनवण्याचा पहिला अधिकार त्याच पक्षाला दिला जातो…400 पर ची घोषणा करून भाजपने त्यांचा टारगेट आकडा मोठा गेला… त्याला हवा दिली… यामुळे अनेक काठावरची मतं भाजपकडे शिफ्ट झाली… 400 जागा भाजपला संविधान बदलण्यासाठी हव्या आहेत, असं जेव्हा त्यांचं निगेटिव्ह कॅम्पेनिंग सुरू झालं तेव्हा भाजपने ते बंद केलं. पण तोपर्यंत या अबकी बार 400 पारचा इंपेक्ट लोकांवर पडलेला होता…

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला किंवा विरोधकांना भाजपच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाचा फायदा उचलण्याच्या चार संधी आल्या होत्या…पण त्याच काळात विरोधकांनी म्हणावं असं काम केलं नाही…गुजरात मधील पटेलांच्या आंदोलनापासून ते महाराष्ट्रातील मराठा आरक्षणामुळे पेटलेलं वातावरण अशा भारताच्या पाठीवर घटनांच्या अनेक मालिका होऊन गेल्या या काळात जनमत भाजपच्या विरोधात होतं…तेव्हा हा स्पेस विरोधकांनी कॅप्चर केला असता, तर भाजपचा सुपडासाफ झाला असता. पण विरोधक याकाळात थंडे राहिले.. त्यात शेवटच्या काही दिवसात विरोधकांनी इंडिया आघाडीचा प्रयोग केला…तेव्हा कूठे ही आघाडी भाजपला कडवं आव्हान उभे करेल, असं वाटलं होतं…पण बैठकांमधून आउटपुट बाहेर न निघणं, जागा वाटपामुळे झालेला खोळंबा यामुळे आघाडीत दुफळी निर्माण झाली…आश्चर्य वाटावी अशी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यानंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकांत यातल्या काही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करून इंडिया आघाडीवर आपला डोमिनन्स ठेवण्यासाठी काँग्रेसने जवळपास सहा ते सात महिने आघाडीला संथ ठेवलं… याचाच फायदा उचलत भाजपने पुन्हा आपल्या बाजूने वातावरण तयार करून घेतलं राम मंदिर आणि त्यानंतर इंडिया आघाडीतील मेजर घटक पक्ष फुटल्यामुळे आघाडी पुन्हा एकदा कमकुवत झाली.. आणि इथेच भाजपचा तिसऱ्यांदा विजय नोंदवला गेला…

थोडक्यात काय तर आकड्यांची गोळाबेरीज, विरोधकांनी केलेल्या चुका आणि भाजपने तयार केलेलं परसेप्शन यामुळे भाजपला सलग तिसऱ्यांदा बहुमताचा आकडा आरामात ओलांडता येईल, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणं आहे…एवढंच नाही तर मोदींची लाट असताना भाजपने जो 303 चा आकडा गाठला होता त्यालाही क्रॉस 2024 चा आकडा जाईल, असही त्यांनी कॉन्फिडंटली सांगितलंय…हे सगळं विश्लेषण पाहता खरंच नरेंद्र मोदी सत्तेची हॅट्रिक पूर्ण करतील का? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद !